Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शेतकर्‍यांना पहिल्यांदाच ऑटोमॅटिक मीटर पद्धतीने होतेय पाणीवाटप

Share
शेतकर्‍यांना पहिल्यांदाच ऑटोमॅटिक मीटर पद्धतीने होतेय पाणीवाटप, Latest News Farmers Automiter Water Karjat

कुकडीच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांचे निवेदन

कर्जत (तालुका प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघातील जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या पाणीवाटपाबाबत यापूर्वी पाण्याचे कसलेच नियोजन नसल्याने तालुक्यात किती प्रमाणात पाणी आले आहे? त्याचे योग्य वाटप होते का? याबाबत अंदाज बांधता येत नव्हता; मात्र नुकत्याच झालेल्या अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी कुकडी प्रश्नासंदर्भात प्रश्न मांडले.

या चर्चेत पाण्याचे योग्य नियोजन व वाटपासाठी ऑटोमॅटिक मीटर लावण्याची मागणी केली होती.जेणे करून पाणीवाटपात पारदर्शकता येईल. त्यानुसार आता हे मीटर बसवण्यात आले असून पाणीवाटप होत आहे. तसेच कुकडी प्रकल्पाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमदार रोहित पवार यांनी जलसंपदा विभागाचे सचिव आय. एस. चहल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी आमदार रोहित पवार यांनी कुकडीच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली होती. अनेक वर्षांपासून कुकडी भू संपादनाचा तसेच चार्‍यांच्या अस्तरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. काही प्रमाणात आमदार पवार यांनी हे प्रश्न मार्गी लावण्यात यशही मिळवले आहे.

पाण्याच्या नियोजनासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक खलील अन्सारी आणि अधीक्षक अभियंता धुमाळ यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला. त्यानुसार त्यांच्या आश्वासनानुसार कुकडी धरणातून शेतीसाठी योग्य वेळी पाणी सोडले. विशेष म्हणजे नियोजनाच्या एक दिवस अगोदरच हे पाणी कर्जतला पोहोचले. आता मीटर पद्धतीने होणार्‍या पाणी वाटपामुळे शेतकर्‍यांना समान न्याय मिळणार असून या पाठपुराव्याचे शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे.

आमदार पवार यांनी दिलेल्या निवेदनाचे ठळक मुद्दे
मंजूर आराखड्यातील शेवटच्या शेतकर्‍याला शेतीसाठी पाणी देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी चार्‍यांच्या अस्तरीकरणाची कामे होणे आवश्यक आहे.कुकडीसाठीच्या आगामी अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्यात यावी. कुकडी प्रकल्पासाठी भू संपादित शेतकर्‍यांना मोबदला मिळावा. 80 गावांतील सुमारे दोन हजार शेतकर्‍यांचे पैसे थकीत आहेत, तेही त्वरीत मिळावेत. यावेळी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा विभागाचे सचिव आय. एस.चहल यांनी दिले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!