Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

संगमनेर : विज अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यु

Share

संगमनेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील वरुडी पठार येथील शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे. घटना बुधवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. सुनील गणपत फटांगरे (वय४५) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

वरुडी पठार येथील शेतकरी सुनील फटांगरे बुधवारी आपल्या शेतातील हरभरा पिकाची काढणी करत होते. शेतात काम करत असताना संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास विजांचा कडकडाट झाला. काही क्षणात त्याच्या अंगावर वीज पडल्याने फटांगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून गुंजाळवाडी पठार येथील दोन जनावरे वीज पडून मरण पावली आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!