Wednesday, April 24, 2024
Homeनगरशेततळ्यात विषारी औषध टाकल्याने हजारो मासे मृत्यूमुखी

शेततळ्यात विषारी औषध टाकल्याने हजारो मासे मृत्यूमुखी

शेतकर्‍याचे सात लाखांचे नुकसान, माहेगाव देशमुख येथील घटना

कोपरगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील रावसाहेब शिंदे यांच्या शेततळ्यात अज्ञाताने इसमाने टाकलेल्या विषारी औषधामुळे मर्‍हळ जातीचे मासे मृत्यूमुखी पडुन शेतकर्‍यांचे सात लाखाचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली.

- Advertisement -

रावसाहेब सोपान शिंदे यांची कोळपेवाडी कोपरगावरस्त्या लगत माहेगाव देशमुख येथे ऐक हेक्टर 88 आर शेती आहे. त्यांनी वीस गुंठ्यात शेततळे करून पाणी साठवणूक करून शेतीत बारमाही पिके घेत आहे. त्याच बरोबर उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने शेतीला जोडधंदा म्हणून शेततळ्यात मुलगा किरण याने आक्टोबर 2019 मध्ये मर्‍हळ जातीचे दोन लाख रुपये किमतीचे सोळा हजार बीज सोडले. आतापर्यंत खाद्य व जाळीवर 1 लाख रुपये खर्च केला. जूनमध्ये मासे विक्री चालू होऊन ठोक भावाने सात लाख रुपये उत्त्पन्न हातात येणे अपेक्षित होते.

मात्र अज्ञात आरोपीने शेत तळ्याचे उत्तर बाजूने कंपाउंड ची जाळी कट करून आत प्रवेश करत विषारी औषध तळ्यात टाकले. ही बाब किरण यांच्या लक्षात शनिवारी दुपारी खाद्य टाकण्यास गेले असता आली. शेकडो मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसले व पाण्याचा रंग पांढरा होऊन दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. यासदर्भात त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल कटके यांचीे भेट घेत अज्ञात आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर पोलिसांनी मत्स्य विकास अधिकारी यांच्या अहवाला शिवाय गुन्हा नोंद करता येणार नाही असे सांगितले.

विषबाधा कुठल्या कारणाने झाली, विषारी औषध कोणते? हे तपासण्याचे काम अहमदनगर मत्स्य विकास अधिकारी यांचे कडे असल्याने शिंदे यांनी मत्स्य विभाग प्रमुख यांचेशी संपर्क केला असता, आम्हास करोना बंदोबस्त कामी नेमण्यात आले आहे. इतक्या दूरवर आम्हास येण्यासाठी शासकीय वाहन नाही. मासे बाहेर काढून पुरून टाकण्याचा अजब सल्ला शिंदे यांना देण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद असताना शेतकरी जनतेची भुख भागवण्यासाठी काबाडकष्ट करत आहे. त्याच्याच बाबतीत शासकीय यंत्रणा अकार्याक्षमपणे वागत आहे. या अगोदर शेतातून मोटारीची केबल ऊस व मका पीक चोरीला जाणे या घटना वारंवार घडल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या