Wednesday, May 8, 2024
Homeदेश विदेशकुटुंब दिन विशेष !

कुटुंब दिन विशेष !

आज कुटुंब दिवस. संयुक्त कुटुंब पद्धतीच्या जोरावर देशभरातील अनेक कुटुंबांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये नाव कमवलेल्या निवडक कुटुंबियांची माहिती घेऊ या.

कपूर कुटुंब : हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध कुटूंबाबद्दल बोलताना पहिले नाव कपूर कुटुंबियांचे येते. हे कुटुंब हिंदी चित्रपटसृष्टीमधील सर्वात जुने कुटुंब आहे. पृथ्वीराज कपूर यांनी सिनेमा क्षेत्रात आपले स्वप्ने पूर्ण करण्यासाठी चित्रपट जगात पाऊल ठेवले. त्यांच्यानंतर त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. रणधीर, ऋषी व राजीव कपूर हे राज कपूर यांचे मुले. त्यातील रणधीर कपूर यांनी अभिनेत्री बबिता सोबत लग्न केले. त्यांच्याच दोन मुली म्हणजे करिश्मा व करीना कपूर.

- Advertisement -

बच्चन कुटुंब : हिंदी चित्रटसृष्टीत ‘बिग बी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ यांनी त्यांचे वडील प्रसिद्ध कवी हरिवंश राय बच्चन यांच्यापेक्षा वेगळी कला चित्रटसृष्टीत दाखवली. अमिताभ बच्चन यांनी अभिनेत्री जया भादुरीशी लग्न केले. त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांनी देखील अनेक चित्रपटांमध्ये काम केले व विश्र्वसुंदरी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनशी लग्न केले.

जोहर – चोप्रा कुटुंब : बलदेव राज चोप्रा यांनी ‘बीआर फिल्म्स प्रोडक्शन हाऊस’ या चित्रपट बनवणाऱ्या कंपनीची स्थापना केली. बलदेव चोप्रा यांचे लहान बंधू यश चोप्रा यांनी देखील चित्रपटसृष्टी मध्ये वर्चस्व गाजवत होते. यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा देखील दिग्दर्शक आहे. तसेच यश चोप्राची बहीण हेरूचे लग्न यश जोहर यांच्याशी झाले आणि हीरू व यश जोहरचा मुलगा म्हणजे सध्याचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहर.

खान कुटुंब : दबंग अभिनेता सलमान खान तसेच अरबाज व सोहेल खान हे प्रसिद्ध लेखक सलीम खान व सलमा खान यांचे मुले आहेत. सलीम खान यांनी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हेलनशी दुसरे लग्न केले. तर अरबाज खानने अभिनेत्री मलायका अरोराशी लग्न केले. अभिनेत्री अमृता अरोरा ही मलायका अरोराची धाकटी बहीण आहे. सलीम खान यांची मुलगी अलविरा खानने अभिनेता अतुल अग्निहोत्रीशी लग्न केले आहे.

अनिल कपूर कुटुंब :
कपूर फॅमिली पृथ्वीराज कपूर यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त आणखी एक कपूर कुटुंब आहे. चित्रपट निर्माते सुरिंदर कपूरच्या तीन मुलांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. बोनी कपूर, अनिल कपूर आणि संजय कपूर अशी तीन नावे. बोनी कपूर यांनी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीशी लग्न केले. अनिल कपूर यांच्या दोन्ही मुली देखील चित्रपटसृष्टीशी जोडल्या गेल्या आहे. सोनम कपूर अभिनेत्री आहे तर दुसरी मुलगी रिया कपूर निर्माता आहे. बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना यांचा मुलगा अर्जुन कपूर आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या