Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पैशांसाठी कुटुंबाचे अपहरण; व्याजाचे पैसे वसुलीसाठी टोळक्याचे कृत्य

Share

नाशिक । प्रतिनिधी

व्याजाने घेतलेली रक्कम परत करण्यास विलंब होत असल्याने चौघांच्या टोळक्याने एका कुटुंंबियांचे अपहरण करीत त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हेमंत जाधव (रा. मखमलाबाद), दत्ता काळे (दिंडोरीरोड, पंचवटी), अमित इर्शिद उर्फ टोनी (रा. कॅनडा कॉर्नर), रिकी सुधीर धोंड (रा. मल्हारखान झोपडपट्टी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

या प्रकरणी स्वप्निल दत्तात्रय माळवे (रा. जयश्री प्लाझा, कलानगर, इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, माळवे यांच्यावर असलेले बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी 2016 मध्ये संशयितांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु दरम्यानच्या काळात माळवे यांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने ते व्याजाने घेतलेले पैसे देऊ शकले नाहीत. त्यामुळे संशयित हेमंत जाधव याने वारंवार फोन करून शिवीगाळ करीत; ठार मारण्याची धमकी दिली. संशयित दत्ता काळे, संशयित टोनी यांनी माळवे यांना शिवीगाळ करत धमक्यांचे सत्र सुरू केले होते.

दोन दिवसांपूर्वी संशयित धोंड याने माळवे व त्यांच्या कुटुंबियांना कारमध्ये बळजबरीने बसवून कॉलेजरोड येथे आणले आणि त्यांच्याकडून बळजबरीने स्टॅम्पपेपरवर हमीपत्र तयार करून घेतले. संशयितांकडून वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर माळवे यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात खंडणी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!