आज दिवसभर नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या पोस्टरचीच चर्चा

आज दिवसभर नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटाच्या पोस्टरचीच चर्चा

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या अनेक दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा नवा कोरा ‘झुंड’ चित्रपटाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. अखेर आज या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्याने अमिताभ बच्चन यांचा हटके लुक त्यामुळे कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

वादविवाद आणि हो-नाहीच्या जाळ्यात हा चित्रपट अडकला होता. हे पोस्टर बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर  केल्यानंतर सर्वत्र हे पोस्टर पसरले. अनेकांनी मोबाईलमध्ये स्टेट्सला ठेवले तर अनेकांनी भरभरून लाईक्स आणि कमेंटच्या माध्यमातून प्रतिसाद दिला.

या पोस्टरमध्ये पाठमोरे उभे असलेले अमिताभ बच्चन दिसत आहेत. ते एका झोपडपट्टीसमोर उभे राहून कसला तरी विचार करताना दिसत आहेत.

झुंड हा मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेल्या नागराज मंजुळे यांचा पहिला वाहिला हिंदी चित्रपट आहे.  या चित्रपटात अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले असल्याने  ‘झुंड’बद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘झुंड’ चित्रपट एका फुटबॉल टीमचे यशावर असल्याचे समजते. एक प्रशिक्षक जेव्हा झोपडपट्टीतल्या मुलांना प्रशिक्षित करून संघ सातासमुद्रापार नेतो त्याच्या यशाचे गमक या चित्रपटातून साकारण्यात आल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com