Wednesday, April 24, 2024
Homeनगरईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात पोलिसांचे संचलन

ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात पोलिसांचे संचलन

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. सर्व धार्मिक उत्सव घरामध्ये साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी शहरातील प्रमुख भागात संचलन करून नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. करोना विरोधात अहोरात्र लढा देणाऱ्या पोलिसांच्या कामगिरी बद्दल नागरिकांनी रस्त्यावर उतरून पोलिसांवर फुलांचा वर्षाव करत टाळ्या वाजवून स्वागत केले.
करोना संसर्गाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस मेहनत घेत आहे. धार्मिक कार्यक्रम घरातच साजरे करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुस्लिम समाजाने संयम बाळगून रमजानमध्ये पोलीस प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य केले आहे. असेच सहकार्य करत रमजान ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दोन दिवसापूर्वी बैठक घेऊन केले आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहर पोलिसांनी संचलन केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना, भिंगार पोलीस ठाण्याचे कर्मचारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस, क्यूआरटी, आरसीपी, एसआरपीएफ पथक संचलनामध्ये सहभागी झाले होते. रामचंद्र खुंट, हतमपुरा, पाशा खुंट, विशाल गणपती, माळीवाडा वेस असे संचलन केले. यानंतर भिंगार परिसरात संचलन करण्यात आले. नियमांचे पालन करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. दोन महिन्यापासून करोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसांवर नागरिकांनी फुलांचा वर्षाव केला.
- Advertisment -

ताज्या बातम्या