Wednesday, April 24, 2024
Homeनगरघराघरात ईदची नमाज

घराघरात ईदची नमाज

अहमदनगर (प्रतिनिधी) – लॉकडाऊन काळात मशिदी कुलूपबंद झाल्याने मुस्लीम बांधवांनी आज घरातच रमजान ईदची नमाज अदा केली. यावेळी देशासह जगाच्या भल्याची प्रार्थना अल्लाहकडे करण्यात आली. यंदा प्रथमच खरेदी अन् गळाभेटीविना ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद शहरासह जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

महिनाार रोजे, नमाज, तरावीह, तिलावत ए कुरआन, जकात, खैरात या सर्व बाबींचे पालन करून अल्लाहला प्रसन्न करण्याच्या केलेल्या प्रयत्नांच्या इनाम प्राप्तीचा दिन म्हणजे ईद. कोरोना नावाच्या अतिसूक्ष्म अशा विषाणूने ब्रम्हांडनायक अल्लाह / ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती देत या जगाची सर्व गणितं बदलून टाकली. मंदिरआणि मशिदी कुलुप बंद झाल्या. संचारबंदीही बाहेर पडणेही मुश्कील झाले. त्यामुळे घराघरात आज सोमवारी ईदची नमाज अदा करण्यात आली. घरातही मुस्लीम बांधवांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले. यंदा गळाोट न घेता दूरूच ईदच्या शुोच्छा देण्यात आल्या.

- Advertisement -

नवा इतिहास….
रमजान ईद म्हटल्यावर दरवर्षी नवीन कपडे परिधान केले जातात. महिला भगिनी साजशृंगार करतात. मेहंदी लावतात. परंतु यावर्षी बाजार बंद असल्याने कोणीही नवीन कपड्यांचा आग्रह धरला नाही. सर्वांनी अत्यंत साध्या पद्धतीने ईद साजरी केली. कधीकाळी खलिफा हजरत उमर बिन अब्दुल अजीज व त्याच्या मुलांनी जुने कपडे घालून ईद साजरी केली होती. त्याची पुनरावृती आज झाली आणि एक नवा इतिहास निर्माण झाला. इतक्या साध्या पद्धतीने ईद साजरी करूनही सगळे कसे आनंदी दिसत होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या