Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

Video # भर रस्त्यावर दारूड्याच्या खिशातून पैसे लांबविले

Share
भर रस्त्यावर दारूड्याच्या खिशातून पैसे लांबविले, Latest News Drunking Man Poket Money Thife Ahmednagar

नगर शहरात दुपारी एकच्या सुमारास माळीवाडा भागातील घटना

अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्याच्या कडेला दारूच्या नशेत तर्र होऊन पडलेल्या दारूड्याच्या जवळ दोन तरूण आले. यातील एकाने त्याचे हात पकडले तर दुसर्‍याने आधी खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. दारूड्याच्या चोरखिशात पैसे असल्याचे लक्षात आल्यानंतर संबधिताने चक्क ब्लेडने त्याचा खिसा कापून त्यातून पैसे काढून त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला.

माळीवाडा एसटी स्टॅड या ठिकाणी भर रस्त्यावर हा प्रकार घडला. रस्त्यावरून जाणार्‍यांनी याकडे दुलर्क्ष केले. गुरूवारी ड्राय डे असतांना असा प्रकार घडल्याने इतर दिवशी या ठिकाणी काय परिस्थिती असेल, हे सांगायला नको. याच रस्त्यावरून दररोज शाळकरी, महाविद्यालयीन मुली, प्रवासी महिला, नोकरदार महिला प्रवास करत असतात. त्यांच्यादृष्टीने हा रस्ता किती धोकदायक आहे हे लक्षात येते. त्या मुली आणि महिला दररोज या ठिकाणाहून कसा प्रवास करत असतील, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!