Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नाट्य परिषदेची इलेक्शन घंटा

Share
यंदा 13 जिल्ह्यांत चालतं-फिरतं नाट्य संमेलन... , Latest News Distric Theatrical Sanmelan Ahmednagar

8 मार्चला मतदान

अहमदनगर (प्रतिनिधी) – अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नगर जिल्हा शाखा कार्यकारी मंडळाचे इलेक्शन जाहीर करण्यात आले आहे. 8 मार्चला त्यासाठी मतदान होणार असूनमतमोजणीनंतर लगेचच निकाल घोषित केला जाणार आहे.

अहमदनगर जिल्हा शाखेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शेखर रामचंद्र वाघ यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे. काल शुक्रवारी मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शनिवारी व रविवारी (दि.22, 23) संधी देण्यात आली असून त्यासाठी पुराव्याची अट टाकण्यात आली आहे.

सोमवारी अंतिम पात्र मतदारांची यादी कार्यालयातील फलकावर प्रसिध्द केली जाणार आहे. पंचवार्षिक कार्यकारीणी मंडळाचे इलेक्शन लढविण्यास इच्छुक उमेदवारांना 24 आणि 25 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली आहे. अर्ज माघारीची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. 8 मार्चला मतदान व लगचेच निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शेखर वाघ यांनी दिली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!