Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

डोंगरगण बनलेय प्रेमीयुगुलांसाठी ‘लव्हर पॉइंट’

Share
डोंगरगण बनलेय प्रेमीयुगुलांसाठी ‘लव्हर पॉइंट’, latest News Dongargan Lover Point Problems Ahmednagar

विद्यार्थ्यांकडून अश्लील चाळे : ग्रामस्थांना मनस्ताप

अहमदनगर (वार्ताहर) – नगर तालुक्यातील ऐतिहासिक, धार्मिकस्थळ म्हणून ओळख असणारे डोंगरगण गाव व परिसर प्रेमीयुगुलांसाठी लव्हर पॉइंट बनले आहे. या ठिकाणी सुरू असणार्‍या अश्लील चाळ्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. यामुळे या ठिकाणी पोलिसांनी संबंधित प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

नगर-वांबोरी रोडवर असणार्‍या डोंगरगण गाव हे धार्मिकदृष्टीने महत्त्वाचे गावा आहे. या ठिकाणी सीतेची नहाणी, रामेश्वर हे भगवान शंकराचे मंदिर आहे. या ठिकाणी वर्षभर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रावण महिन्यात महिनाभर या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते. या भागातील निसर्ग अतिशय समृद्ध असल्याने मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक आकर्षित होतात.

नगर शहरापासून हे ठिकाण अवघ्या 15 किमी अंतरावर असल्याने या ठिकाणी सहज कोणीही पोहचू शकते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात प्रेमीयुगुलांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये कॉलेज तरुण तरुणींची संख्या जास्त आहे. डोंगर टेकडी, खोल दरी, घनदाट जंगल यामुळे एकांत मिळतो. अशा वातावरणात प्रेमीयुगुलांची अश्लील चाळे सुरु असतात. त्याचा परिणाम येथे येणार्‍या पर्यटकांवर देखील होत आहे.

ऐतिहासिक वस्तूंवर नावे टाकून विद्रुपीकरण करण्यात येत आहे. डोंगरगण शेजारी गोरक्षनाथ गड, मांजरसुंबा गड, वांबोरी घाट परिसरात प्रेमीयुगुलांची वर्दळ दिसून येते. डोंगरगण परिसरात प्रेमीयुगुल तसेच पर्यटकांना अडवून ब्लॅकमेल, लुटण्याचे प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. टारगट प्रेमीयुगुलांकडून स्थानिकांना शिवीगाळ दमबाजी करण्यात येत असल्याने डोंगरगण ग्रामस्थांना हकनाक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

बंदोबस्त होणे गरजेचे
धार्मिक ऐतिहासिक डोंगरगण गावाला प्रेमीयुगुलांमुळे मनस्ताप होत आहे. ऐतिहासिक वस्तूंचे विद्रुपीकरण थांबविण्यासाठी तसेच धार्मिक स्थळांचे पावित्र्य राखण्यासाठी प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
-कैलास पटारे, सरपंच, डोंगरगण.

या ठिकाणी यापूर्वी एकांकात असणार्‍या जोडप्यांना मारहाण आणि लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. यासह या भागातून प्रवास करताना कोण कशासाठी या ठिकाणी आलेले आहेत, याचा अंदाज नसल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. यामुळे एमआयडीसी पोलिसांनी वेळीच या ठिकाणी लक्ष देणे आवश्यक आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!