Wednesday, April 24, 2024
Homeनगरजिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द

अहमदनगर (प्रतिनिधी) – राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित अशा सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. या नियुक्तीबाबचा शासन निर्णय काल शुक्रवारी काढण्यात आला आहे. यात नगरचाही समावेश आहे. या समितीत भाजपाचे सदस्य सर्वाधिक होते. त्याऐवजी आता कांंँग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, सदस्यांना संधी मिळणार आहे.

या समितीतील आमदार, जिल्हा परिषद सदस्यांबरोबर नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. गतवेळी भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार असल्याने या पक्षांच्या 16 जणांची नियुक्ती या समितीवर करण्यात आली होती. यात भाजपचे सर्वाधिक 12 सदस्य होते. तर शिवसेनेच्या केवळ चार सदस्यांचा समावेश होता. आता या समितीवरील नियुक्त्या रद्द झाल्या आहेत.

- Advertisement -

भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, शिवसेनेचे अनिल शिंदे (नगर), माजी आमदार चंद्रशेखर कदम (राहुरी), दिनकर गर्जे (नेवासा), बिपीन कोल्हे (कोपरगाव), बबन मुठे (श्रीरामपूर), वैशाली नान्नोर (राहुरी), राजेंद्र म्हस्के (श्रीगोंदा), बाळासाहेब सानप (नगर), नितीन कापसे (राहाता), सुदाम सानप (संगमनेर), रवींद्र सुरवसे (जामखेड), सुनील साळवे (जामखेड), अविनाश कोतकर (नगर), राजेंद्र दळवी (नगर), राजेंद्र झावरे (कोपरगाव) या सदस्यांची तत्कालीन राम शिंदे यांनी नियुक्ती केली होती.

श्रीरामपूूरचे बबन मुठे यांनी या नियोजन समितीच्या माध्यमातून सरला बेट, अडबंगनाथ देवस्थान, गणेशखिंड देवस्थानसाठी निधी मिळावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मिळवून दिला. तसेच श्रीरामपूर तालुक्यातील काही गावांचेही प्रश्‍न मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या