Friday, April 26, 2024
Homeनगरपिक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदत कर्ज परतफेडीला 30 जून पर्यंत ...

पिक कर्ज, मध्यम व दीर्घ मुदत कर्ज परतफेडीला 30 जून पर्यंत मुदतवाढ; जिल्हा बँक चेअरमन सिताराम पाटील गायकर

अहमदनगर ( प्रतिनिधी ) – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पिक कर्ज तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना भारतीय रिझर्व बँकेने तर फेडीसाठी तीन महिन्याची मुदत दिली असल्याने बँकेने 31 मार्चअखेर वसूल पात्र असलेल्या सर्व कर्जाची परतफेड येत्या 30 जून पर्यंत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली
जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वाटप केलेल्या कर्जाचा वसूल पात्र कर्जाचा भरणा दिनांक 31 मार्च रोजी करण्यासाठी काही शाखांमध्ये कर्जदारांनी गर्दी केलेली होती सध्याच्या कोरोणा संसर्गजन्य रोगामुळे शासनाने सर्वत्र 144 कलम लागू केल्याने व कर्जफेडीस मुदती वाढीचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आदेश नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये व शासनाच्या 144 कलमाचे आदेशाने शाखांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून बँकेने दिनांक 27 मार्च ज्यांना वसुली द्यायची आहे त्यांचे सोईकरता दिनांक 28 व 29 मार्च रोजी शाखा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या तथापि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे आदेश दिनांक 27 मार्च रोजी बँकेस उशिरा प्राप्त झाल्याने बँकेने आज तात्काळ दिनांक 28 मार्च रोजी सुधारित परिपत्रकाद्वारे सर्व शाखांना व प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांना सुचना देण्यात आल्याची माहिती श्री गायकर यांनी देऊन ते पुढे म्हणाले संपूर्ण देशभरात दिनांक 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन करण्यात आलेले आहे कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी राज्यात करण्यात आलेल्या विविध योजनांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याने भारतीय रिझर्व बँकेने दिनांक 27 मार्च रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत इत्यादी कर्जाच्या वसुलीस पात्र(परतफेड) दिनांक 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष गायकर यांनी दिली.

बँकेच्या नियोजित धोरणानुसार या परतफेडीची मुदत दरवर्षी 31 मार्च असते या निर्णयाचा अहमदनगर जिल्ह्यातील बँकेच्या संलग्न प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायट्या शेतकरी कर्जदार सभासदांना फायदा होणार आहे. जिल्हा बँकेने खरीप पिकासाठी सुमारे 711 कोटीचे तर रब्बी पिकांसाठी सुमारे 82 कोटी चे कर्जवाटप केले असल्याची माहिती अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या