Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्ह्यात दीड लाख जनतेच्या घशाला कोरड

जिल्ह्यात दीड लाख जनतेच्या घशाला कोरड

85 पाण्याचे टँकर सुरू; संगमनेरसह दक्षिण जिल्ह्यात टंचाईच्या झळा

अहमदनगर (प्रतिनिधी) – विक्रमी पावसानंतर देखील जिल्ह्यात उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. करेाना संसर्गाच्या सावटा खाली जिल्ह्यात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर आणि राहुरी तालुके वगळता अन्य 11 तालुक्यात 85 सरकारी पाण्याच्या टँकरव्दारे 1 लाख 51 हजार 571 लोकांच्या घशाची कोरड भागविण्यात येत आहे.

- Advertisement -

जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीच्या 162 टक्के अधिक पाऊस झाला होता. यामुळे जिल्ह्यातील धरणासह लहान प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असतांनाही नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, नेवासा आणि अकोला या तालुक्यात सध्या सरकारी पाण्याचे टँकर सुरू आहेत. यात संगमनेर हा उत्तरेतील तालुका असून या ठिकाणी सध्या 9 टँकर सुरू आहेत. मात्र, तालुक्यात टँकरची मागणी वाढत असून उन्ह्याची वाढलेली तीव्रता आणि करोनाच्या प्रकोप यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.

दरम्यान दक्षिण जिल्ह्यातील नगर आणि पारनेर तालुक्यात 51 हजार जनतेची तहान सरकारी पाण्याच्या टँकरवर अवलंबून आहे. पाऊस लांबल्यास या ठिकाणी पाण्याच्या टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नगर तालुक्यातील काही पट्ट्या गेल्या वर्षी पावसाने हात दाखविल्याने या ठिकाणी शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न होता. मात्र, गेल्या काही वर्षाच्या तलुनेत यंदा सरकारी पाणी आणि टँकरवरील कोट्यावधी रुपयांचा खर्च पावसाने वाचविलेला आहे.

चार तालुके टँकर मुक्त
जिल्ह्यातील राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरी हे तालुके दुष्काळाच्या झळापासून लांब आहे. यातील श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात यापूर्वी अपवादाने पाण्याचे टँकर सुरू करण्यात येत होते. यंदा देखील या तालुक्यात पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत समाधानकारक परिस्थिती आहे.

असे आहेत टँकर लोकसंख्या
नगर 16 (30 हजार 583), पारनेर 23 (23 हजार 949), कर्जत 13 (27 हजार 891), जामखेड 11 (19 हजार 787), संगमनेर 9 (16 हजार 195), पाथर्डी 5 (12 हजार 622), श्रीगोंदा 6 (10 हजार 629), शेवगाव 4 (5 हजार 716), अकोले 2 (3 हजार 296) आणि नेवासा 1 (841) असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या