Thursday, April 25, 2024
Homeनगरयंदा 13 जिल्ह्यांत चालतं-फिरतं नाट्य संमेलन…

यंदा 13 जिल्ह्यांत चालतं-फिरतं नाट्य संमेलन…

शंभरीचा नगरी प्रयोग

अहमदनगर (प्रतिनिधी) – तब्बल 17 वर्षांच्या ब्रेकनंतर नगरी मातीत 100व्या नाट्य संमेलनाचा (प्र)योग जुळून आला आहे. संमेलनाची शताब्दी साजरी करणारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने यंदा प्रथमच चालतं-फिरतं संमेलन आयोजित केलं आहे. कर्नाटकात सुरू झालेल्या संमेलनाचा पडदा नगरमार्गे मुंबईत पडणार आहे.

- Advertisement -

मेमध्ये मेजवानी…
शताब्दी वर्षातील नाट्यसंमेलनाचा नगरी योग 1 ते 3 मे या काळात जुळून आला आहे. तीन दिवस नगरकरांना या संमेलनाची मेजवानी मिळणार आहे. या संमेलनात चार नाटकांचा प्रयोग रसिकांना पाहावयास मिळणार आहे. 2003मध्ये नगरमध्ये जयमाला इनामदारांच्या अध्यक्षतेखाली अन् तत्कालीन खासदार दिलीप गांधी स्वागताध्यक्ष असलेले नाट्य संमेलन ‘भोजनभाऊ’ शब्दप्रयोगाने राज्यभर गाजले. यंदा मात्र, प्रथमच नगरचे नाट्यकर्मी मतभेद विसरून संमेलन यशस्वीतेसाठी एकत्र आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या