Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

शिर्डी साईबाबा, शनि शिंगणापूर, मोहटा, देवगड, कोल्हारची मंदिरे दर्शनासाठी बंद

Share
शिर्डी साईबाबा, शनि शिंगणापूर, मोहटा, देवगड, कोल्हारची मंदिरे दर्शनासाठी बंद, Latest News Distric Temple Close Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील विविध देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. महाराष्ट्रात फोफावत चाललेल्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेत पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानापासून ते शेगाव येथील गजानन महाराज देवस्थानासह बहुतेक देवस्थानांनी देवदर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यात आता नगर जिल्ह्यातील शिर्डी संस्थान, शनि शिंगणापूर, नेवासा, कोल्हार, मोहटा आणि देवगड येथील सर्व मंदिरे दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नगर जिल्ह्यातील शिर्डीतील साईबाबा मंदिर, नेवासा तालुक्यातील शनि शिंगणापुरातील शनैश्‍वर देवस्थान प्रशासनाने शनि देवाचे दर्शन काल सायंकाळपासूनच बंद केले आहे.

तसेच नियोजित कार्यक्रम पूर्णतः रद्द केले आहेत. नेवासा येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील देवदर्शन व येणार्‍या फाल्गुन वद्य एकादशी वारीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. श्रीक्षेत्र देवगड येथील प्रसादालय, उपहारगृहे व दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थानने घेतला आहे. तसेच मोहाटा देवी, कोल्हारची भगवतीमाता दर्शनही बंद करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील आठवडे बाजार न भरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

शिर्डी रामनवमी उत्सव स्थगित
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डी ग्रामस्थांनी यंदाचा रामनवमी यात्रोत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून याविषयीचे निवेदनपत्र साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांना देण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!