Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्री थोरात यांना विचारून सांगू

Share

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर (प्रतिनिधी)– जिल्हा विभाजनाची चर्चा पुन्हा सुरू झाली असून त्याचा चेंडू पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महसूलमंत्री थोरातांच्या कोर्टात टोलावला आहे. जिल्हा विभाजनाचा निर्णय मंत्री थोरात यांना विचारून सांगू, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

नगर जिल्हा विभाजनाची चर्चा गत पाच-सात वर्षांपासून सुरू आहे. मध्यतंरीच्या काळात जोर धरलेली ही चर्चा काहीशी थांबली होती. त्यासदंर्भात पत्रकारांनी मंत्री मुश्रीफ यांना प्रश्‍न विचारला. त्यावर उत्तर देताना मुश्रीफ यांनी ‘महसूलमंत्री थोरात यांना विचारून सांगतो’ असे उत्तर देत विभाजनाचा निर्णय थोरातांकडे टोलावला.

जिल्हा विभाजन झाल्यानंतर उत्तर जिल्ह्याच्या मुख्यालयाचा प्रश्‍नाही तितकाच चर्चेचा आहे. उत्तरेतील दोन दिग्गज नेत्यांच्या ओढताणीच हा निर्णय झाला नव्हता. आता केवळ मंत्री थोरात हेच निर्णय घेणार असल्याने मुख्यालयाचा प्रश्‍न निकाली निघेल अशी अपेक्षा नगरकरांना आहे. पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्या बिजमाता राहीबाई पोपेरे,आदर्शगाव हिवरेबाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार, माजी क्रिकेटपटू जाहीर खान यांचेही मंत्री मुश्रीफ यांनी अभिनंदन केले.

‘काँग्रेस’मुळे नगरचे पालकमंत्रिपद
मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद हवे होते. तशी कबुलीही त्यांनी शिवभोजन थाळीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिली. मात्र कोल्हापूरमध्ये काँग्रेस आमदार जास्त असल्याने नगरचे पालकमंत्री पद मिळाले असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!