Friday, April 26, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात करोना निवारणार्थ 2 कोटी 30 लाखांचा निधी

नगर जिल्ह्यात करोना निवारणार्थ 2 कोटी 30 लाखांचा निधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारच्यावतीने जिल्ह्यातील करोना विषाणू संसर्ग निवारणार्थ 2 कोटी 30 लाख रुपयांचा निधी मंजूर करून त्याचे वितरण केले आहे. यात सर्वाधिक निधी हा जिल्हा रुग्णालयासाठी 1 कोटी 75 लाख रुपयांचा असून या निधीतून करोना निवारणार्थ विविध उपाययोजना आणि खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून देण्यात आली.

राज्य सरकारकडून हा निधी विभागीय महसूल आयुक्त कार्यालय आणि त्या ठिकाणाहून हा निधी थेट नगरच्या जिल्हा रुग्णालयास पाठविण्यात आला आहे. यात दोन टप्प्यात 1 कोटी 75 लाखांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासह नगर तहसीलदार यांना 5 लाख आणि जिल्ह्यातील उर्वरित तहसीलदार यांना समप्रमाणात 39 लाख, महापालिकेचे आयुक्त यांना 6 लाख तर छावणी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 5 लाख रुपयांच्या निधीचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या