Friday, April 26, 2024
Homeनगरजिल्ह्यात सीमाबंदी

जिल्ह्यात सीमाबंदी

बँका,पतसंस्थांत गर्दी टाळण्याचे आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील बँका, पतसंस्थांनी 31 मार्चपर्यत फक्त रोख भरणा करणे व काढणे ही दोनच कामे प्राधान्याने करावीत. या कामासाठी बँकानी पुरेशे कर्मचारी नेमावेत. जेणेकरून ग्राहकांना बँकेच्या शाखेमध्ये कमीत कमी वेळ व्यतित करता येईल, याबाबतचे आदेश काढले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमिवर पुणे-नगर, पुणे- संगमनेर, नाशिक- संगमनेर, औरंगाबाद-श्रीरामपूर यासह अनेक महामार्ग पोलिसांनी सील केले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

सोमवारचे निगेटिव्ह 3
एकूण निगेटिव्ह 200
रुग्णालय देखरेखीखाली 10
घरी देखरेखीखाली 82
अहवालाची प्रतीक्षा 7
आतापर्यंत तपासणी 207

सर्व शासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांना 31 तारखेपर्यंत मुख्यालयी राहण्याचे आदेश
दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तनोंदणी बंद
नागरिकांनी सुचनांचे पालन करावे, अन्यथा प्रशासन गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याच्या मनस्थितीत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा सार्वमतशी बोलताना इशारा
राज्य सरकारने जिल्ह्याच्या सीमा सील करण्याचे आदेश दिले असून त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी सुरू
नगर शहरातील सर्व रस्ते सील
गंभीर परिस्थिती, राज्य सरकार खंबीर- पालकमंत्री हसन मुश्रीफ
जिल्ह्यातील कोरोनाचा सोमवारी घेतला आढावा
नगर शहरात विनाकारण वाहने घेऊन, पायी फिरणार्‍या 250 व्यक्तींवर कारवाई
जिल्हा परिषद, महसूल विभागात आजपासून अवघे 5 टक्के कर्मचारी काम पाहणार

- Advertisment -

ताज्या बातम्या