Wednesday, April 24, 2024
Homeनगरअन्न धान्य वितरणातील तक्रारी निराकरणास जिल्हास्तरावर कक्ष

अन्न धान्य वितरणातील तक्रारी निराकरणास जिल्हास्तरावर कक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य वितरण व्यवस्थेंतर्गत नागरिकांकडून प्राप्त तकारींचे विहित मुदतीत निराकरण करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने जिल्हास्तरीय पुरवठा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष दररोज सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत कार्यरत राहील.

या संपर्क कक्षातला दूरध्वनी क्रमांक 0241- 2320236 असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले. सोमवार ते बुधवारपर्यत नियंत्रण अधिकारी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सैंदाणे व त्यांच्या समवेत अव्वल कारकून एस. डी. महापुरे, लिपीक व्ही. एस. दासरी, गुरुवार ते शनिवारपर्यंत पुरवठा निरीक्षक अभिजीत वांढेकर, अव्वल कारकून पी. एच. निमसे, श्रीमती भिंगारदिवे व रविवारी पुरवठा निरीक्षक विजय उमाप, लिपीक ए. डी. त्रिंबके यांची कक्षासाठी नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत नियमित नियतनाबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा मोफतचा तांदूळ, तसेच एपीएल शिधापत्रिका धारकांकरिताचे अतिरिक्त नियतन शासनाने उपलब्ध करुन दिले आहे. जिल्हयातील अंत्योदय, प्राधान्य कुंटुंब लाभार्थी व एपीएल कार्डधारकांना निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरित करण्यात येते. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योनजेचा मोफतचा तांदूळ तसेच एपीएल शिधापत्रिकाधारकांना देय असलेल्या धान्याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.

जिल्हयातून तक्रारी प्राप्त होत आहेत. याशिवाय जिल्हयातील रिटेल, होलसेल, किराणा दुकानदार मालाची विक्री चढया भावाने करीत असल्याच्या तक्रारी आहेत. आपत्कालीन परिस्थितीत एलपीजी गॅस सिलींडरचा सुरळीपणे पुरवठा होणे व ग्राहकांच्या तक्रारीचे निराकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी हा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आल्याचे माळी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या