Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

दिशा समितीची बैठक तहकूब

Share

‘दिशा’च्या बैठकीला अधिकार्‍यांची दांडी

अहमदनगर (प्रतिनिधी) – खासदार द्वयींनी कॉल केलेल्या ‘दिशा’च्या बैठकीला अधिकार्‍यांनी दांडी मारली. त्यामुळे आजची बैठक तहकूब करत ती 21 मार्चला ठेवण्यात आली आहे. दरम्यान शहरातील उड्डाणपुलाचा खेळ अजूनही सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकारही यावेळी समोर आला. त्यामुळे खासदार चांगलेच तापले. अन् त्यांनी उपोषणाचा निर्धार बोलून दाखविला.

केंद्र सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणार्‍या निधीचा हिशेब, नियोजन आणि कामाची स्थिती यासंदर्भात माहिती घेण्यासाठी दिशा समितीची बैठक होत असते. खा. सदाशिव लोखंडे आणि डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थितीत आज शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम, पाणी, आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारीच या बैठकीला आले नाहीत. त्यामुळे बैठकच तहकूब करावी लागली.

त्यानंतर खा. डॉ. विखे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. नॅशनल हायवेचे अभियंता दिवाण यांनीही उड्डाणपुलाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. शासकीय, खासगी आणि संरक्षण विभागाची जमीन उड्डाणपुलासाठी संपादीत केली जाणार आहे. त्यातील शासकीय जमीन संपादीत झाली, खासगीही झाल्यात जमा आहे, मात्र संरक्षण खात्याच्या जमिनीचे संपादन रखडले आहे. महापालिकेमार्फत राज्य शासनाकडे मागणी करावी, त्यानंतर संरक्षण विभागाकडे प्रस्ताव जाईल, असे दिवाण यांनी सांगितले.

शासनाकडून प्रस्ताव जाण्यासाठी मंत्रीमंडळाची मान्यता आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. दिवाण यांच्या या माहितीवर खा. विखे भडकले. राज्य शासनाची मान्यता कशासाठी असा सवाल करत शंभर टक्के जामीन संपादीत झाल्याशिवाय उड्डाणपुलाचे काम सुरू होणार नाही. त्यामुळेच मी उपोषणाचा निर्णय घेतला. मात्र महिनाभरात काम मार्गी लागेल असे समजले. त्यामुळे उपोषणाची वेळ येणार नाही असे खा. विखे यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!