Type to search

Featured धुळे

धुळे पोलीस अधीक्षक यांची बदली करा ; नागपूर अधिवेशनात मागणी

Share
कोतवालीच्या चार पोलीस कर्मचार्‍यांचे निलंबन, Latest News Breaking News Kotwali Police Suspended Ahmednagar

धुळे (प्रतिनिधी)-

नागपूर अधिवेशनात आमदार फारुख शहा यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्यासमोर धुळे शहराचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांची बदली करा अशी मागणी केली.

त्यांनी स्पष्ट केलं की, शहरात वाढती गुन्हेगारी वाढत्या चोरीच्या प्रकार दिवसा ढवळ्या व सार्वजनिक स्थळी लुटीचे प्रकार वाढले आहेत. धुळे बस स्थानकात गेल्या दोन दिवसापूर्वी एका शेतकऱ्याचे तीन लाख रूपये चोरी गेले ह्या गुन्ह्याचा तपास अजून लागला नाही अवैध धंदे भरपूर प्रमाणात चालू आहे त्याकडे पोलिस अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे त्यांनीयावेळी सांगितले.

आमदार फारुख शहा यांनी त्यांची त्वरित बदली करा व त्यांच्या जागेवर नवीन कर्तव्यदक्ष पोलिस  अधिकारी यांची नियुक्ती करा अशी मागणी विधान सभा अध्यक्ष यांच्यासमोर मांडली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!