Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमाझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर – धनंजय मुंडे

माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर – धनंजय मुंडे

मुंबई – दरम्यान लॉक डाऊन जाहीर झाल्यापासून ऊसतोड मजुरांच्या घरवापसी पासून ते ते ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी त्यांची सर्व व्यवस्था व्हावी यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे धनंजय मुंडे यांनी आज निघालेल्या या आदेशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

ऊसतोड कामगारांचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा. असे आवाहनही ना. मुंडे यांनी ऊसतोड कामगारांना केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या