Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी

Share
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या शिलकीच्या अंदाजपत्रकाला मंजुरी, Latest News Devlali Pravara Nagarpalika Budget Approval

73 कोटी 45 लाखांचा अर्थसंकल्प सादर; कोणतीही करवाढ नाही

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या सन 2020-21 या आर्थिक वर्षातील 3 लाख 39 हजार 198 रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. यावर्षीच्या अंदाजपत्रकात नगरपरिषदेने कोणतीही करवाढ न करता शहरातील नागरिकांना दिलासा दिला आहे. तर नागरिकांच्या सोयीसाठी विकास कामांसाठी भरीव तरतूद करण्यात आली.

शहरातील सर्व गटारी भूमिगत गटारी करण्यासाठी नियोजन तयार केलेले असून यापुढील काळात देवळाली प्रवरा शहरात उघड्यावरील गटार दिसणार नसल्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी सांगितले. देवळाली प्रवरा नगरपरिषद सभागृहात नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली देवळाली प्रवरा नगरपरिषदेची विशेष सभा झाली. या सभेत मुख्याधिकारी अजित निकत यांनी सभागृहापुढे अंदाजपत्रकाचे वाचन केले.

आरंभी शिल्लक 20 लाख 42 हजार 998 रुपये तर सन 2020-21 या आर्थिक वर्षात अंदाजित जमा होणारी 73 कोटी 28 लाख 54 हजार रुपये असे एकूण 73 कोटी 48 लाख 96 हजार 998 रुपये जमा होणार आहेत. तर अंदाजे खर्च 73 कोटी 45 लाख 57 हजार 800 रुपये गृहीत धरण्यात आला आहे. 3 लाख 39 हजार 198 रुपये शिलकी राहून अंदाजपत्रकास नगराध्यक्षांसह नगरसेवकांनी मंजुरी दिली आहे.

नगरपरिषदेने सन 2020-21 च्या अंदाजपत्रकात लोकउपयुक्त व विविध विकास कामासाठी खालीलप्रमाणे खर्च धरण्यात आला आहे. आस्थापना खर्च 7 कोटी 37 लाख 45 हजार रुपये, प्रशासकीय खर्च 1 कोटी 63 लाख 58 हजार रुपये, व्याज व वित्त आकार 1 कोटी 5 लाख 15 हजार रुपये, मालमत्ता दुरूस्ती व परीक्षण 1 कोटी 22 लाख 40 हजार रुपये, व्यवहार व अंमलबजावणीसाठी 1 कोटी 2 लाख 97 हजार 800 रुपये, विविध खेळांच्या स्पर्धेसाठी 1 लाख रुपये, संकीर्ण खर्च 15 लाख 45 हजार रुपये एकूण खर्च 12 कोटी 48 लाख 800 रुपये, शासन अनुदाने, ठेवी, कर्जे व इतर दायित्वकरीता 60 कोटी 97 लाख 57 हजार असा एकूण खर्च 73 कोटी 45 लाख 57 हजार 800 रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे.

नगरपरिषदेने सन 2020-21 या आर्थिक वर्षात विविध विकास कामे व इतर बाबींसाठी खर्च अपेक्षित धरला आहे. महसुली खर्च 12 कोटी 48 लाख 800 रुपये, अनुदाने व इतर निधीतून खर्च 60 कोटी 97 लाख 57 हजार रुपये त्यातून भुयारी गटार योजनेसाठी 20 कोटी रुपये खर्च, स्विमींग टँक (जलतरण तलाव) 50 लाख रुपये, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान (ठोक अनुदान) 4 कोटी, पंतप्रधान आवास योजनेसाठी 2 कोटी रुपये, शहरातील रस्ते 3 कोटी 50 लाख रुपये, मुळा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना 5 कोटी रुपये, जमीन भूसंपादन 50 लाख रुपये, साथीचे आजार 50 हजार रुपये, नगरोत्थान अंतर्गत विविध विकास कामाकरीता 1 कोटी रुपये, दलित वस्ती सुधारणा योजने अंतर्गत 35 लाख रुपये, दीनदयाळ योजने अंतर्गत बचतगटांना खेळते भांडवल, बचतगट व स्वयंरोजगाराकरीता व्याज अनुदान देण्याकरीता 20 लाख रुपये असे एकूण 73 कोटी 45 लाख 57 हजार 800 रुपये या वर्षीच्या खर्चासाठी अपेक्षित धरण्यात आले आहेत.

अंदाजपत्रकावर उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, नगरसेवक सचिन ढूस, अण्णासाहेब चोथे, बाळासाहेब खुरूद, शैलेंद्र कदम, आदिनाथ कराळे, ज्ञानेश्वर वाणी, संजय बर्डे, तुषार शेटे, शिवाजी मुसमाडे, गणीभाई शेख, नगरसेविका सुजाता कदम, केशरबाई खांदे, अंजली कदम, नंदा बनकर, बेबी मुसमाडे, उर्मिला शेटे, संगीता चव्हाण, सुनीता थोरात, कमल सरोदे आदींनी नगरपरिषदेच्या अंदाजपत्रकावर सविस्तर चर्चा केली. यावेळी अंदाजपत्रकाचे वाचन लेखापाल कपिल भावसार, अजय कासार, ज्ञानदेव शेटे, सुभाष कुलट, आदींनी केले. सभेचे कामकाज कार्यालयीन अधीक्षक बन्सी वाळके, मुकूंद ढूस यांनी पाहिले.

 

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!