कुकाणा-घोडेगाव मार्गावर देवगाव शिवारात आेढे, नालेही या पाण्याने खळखळुन वाहु लागले. पाटपाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या क्षेत्रातील पिके ही चारी फुटल्याने धोक्यात आली आहेत. कुकाणा, चिलेखनवाडी, जेऊरहेैबती, देवगाव, देवसडे, भायगाव शिवारांसाठी ही मुख्य वितरिका (पाटचारी) आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजता या चारीचा भराव फुटल्याने पाटपाण्याची नासाडी झाली. देवगाव शिवारातील शिवाजी पाडळे यांचे मका व कांदा पिके पाण्याखाली गेले आहे. पाटबंधारे अधिकार्यांनी याची पाहणी केली. फुटलेल्या चारीची तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे. तो पर्यंत मुख्य कालव्यापासून या वितरिकेचे पाणी बंद करण्यात आलेले आहे.