Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

देशात आणि राज्यात भाजपच नंबर वन : देवेंद्र फडणवीस

Share
देशात आणि राज्यात भाजपच नंबर वन : देवेंद्र फडणवीस, Latest News Devendra Fadanvis Nagar Statement Ahmednagar

जिल्हाध्यक्ष बेरड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- आजही देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष नंबर एकवर आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतही भाजपाने चांगले यश मिळविले आहे. सध्या एका विरुद्ध तीन अशी लढत असल्याने भाजप मागे असल्याचे भासवले जात आहे. भाजपा सरकारच्या काळात सर्वसामान्य, शेतकरी अशा सर्वांसाठी अनेक योजना राबविल्या त्याचा फायदाही झाला, असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नगरमध्ये व्यक्त केला.

राज्यातील मतदारांनी युतीला जनादेश दिला, परंतु शिवसेनेने वेगळा निर्णय घेतला. आम्ही आज विरोधात असलो तरी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढत राहू. नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चांगले काम आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी पक्षाचे चांगल्या प्रकारे संघटन केले आहे. पुढील काळात भाजप नगर जिल्ह्यात विशेष लक्ष घालून सर्वच निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढेल. पदाधिकार्‍यांनीही पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. बेरड यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री 11 वाजता सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांचा सत्कार प्रा. बेरड यांनी केला. यावेळी सविता भानुदास बेरड, विवेक भानुदास बेरड, अ‍ॅड युवराज पोटे, शामराव पिंपळे, अ‍ॅड विवेक नाईक, प्रसाद ढोकरीकर, भैया गंधे, सुभाष बेरड, रमेश पिंपळे, भाऊ रासने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. बेरड यांनी पक्षाच्या नगर जिल्ह्यातील कामांचा आढावा देऊन जिल्ह्यात पक्षाचे काम चांगल्याप्रकारे सुुरु असून, पदाधिकार्‍यांच्या निवडीच्या प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करत असून, येणार्‍या काळात पक्ष आणखी मजबूत होईल, असा विश्वास फडणवीस यांना दिला. रात्री 11 वाजता फडणवीस यांचे आगमन झाले, त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर भोजन करुन ते पुण्याकडे रवाना झाले. अ‍ॅड.युवराज पोटे यांनी आभार मानले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!