Type to search

Breaking News Featured देशदूत संवाद कट्टा नाशिक मुख्य बातम्या

Video: देशदूत संवाद कट्टा: सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घेण्याची गरज; मुलांनादेखील चांगल्या वाईटाची शिकवण हवी

Share

नाशिक | प्रतिनिधी

दिपाली खेडकर, पीआय भावना महाजन, राधिका काळे, मोनिका बाणाइत

घरात वागताना मुलींवर नेहमीच बंधने घातली जातात. हे कर, ते करू नकोस असे सांगून त्यांच्यातील आत्मविश्वासाला मर्यादा आणल्या जातात.महिला व मुलींच्या सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पहिले तर मुलांना देखील चांगल्या-वाईटाची शिकवण देणे आवश्यक आहे.याशिवाय सोशल मीडियाच्या वापरातून वाढणारे मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी या माध्यमांचा देखील काळजीपूर्वक वापर करण्याची गरज देशदूतच्या संवाद कट्ट्यावरून अधोरेखित करण्यात आली.जागतिक कन्यादिनाच्या पार्श्वभूमीवर मुली व महिलांची सामाजिक सुरक्षा या विषयावर संवाद कट्ट्यावरून हितगूज करण्यात आले.

नाशिक पोलीस आयुक्तालयातील निर्भया सेलच्या पोलीस निरीक्षक भावना महाजनी, समुपदेशक दीपाली खेडकर, राधिका काळे, अ‍ॅड. मोनिका बाणाईत या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या प्रास्तविकातून ‘देशदूत’च्या कार्यकारी संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले यांनी कुटुंबात व समाजात असणारे महिला, मुलींचे स्थान, विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्याकडून पार पाडण्यात येणार्‍या जबाबदार्‍या व शिक्षण. आणि हे सर्व करत असताना त्यांच्यावर जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणी होणारे अन्याय याचा परामर्श घेतला. महिला-मुलींच्या सामाजिक सुरक्षेसाठीच कौटुंबिक पुढाकार व त्याबरोबरीनेच न्यायव्यवस्थेने केलेली तरतूद याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरोधात महिला व मुली मोकळेपणाने बोलू लागल्या असून ही जमेची बाब आहे.

मात्र मुलींच्या मनातील उपजत भीती, अजाणतेपणामुळे घडणार्‍या चुकांबद्दल न बोलण्याची वृत्ती घातक आहे. घरातील मोठी माणसे उदा. आई, आजी, मोठी बहीण, शाळेतील शिक्षिका, मैत्रिणी यांच्याशी बोलून मुलींनी मन मोकळे केले; तर त्यांच्यावर ओढवलेल्या संकटातून मार्ग निघेल. समोरून कोणी त्रास देत असेल तर आता घाबरून चालणार नाही. संकटाचा हिमतीने मुकाबला करण्याची हीच खरी वेळ असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले. आज कुटुंबात आईवडील दोघेही कामाला जातात. त्यामुळे संवाद दुरावला आहे.

मुलींना पालकांकडून पुरेसा वेळ मिळत नसल्याने त्या अजाणतेपणी व भावनेच्या भरात कधी कधी नको ती चूक करून बसतात .संवादाअभावी अनेक सुटणारे प्रश्न अनुत्तरित राहतात. अशावेळी समुपदेशनाच्या माध्यमातून मुलींना मोकळेपणाने बोलायला प्रवृत्त केले जाते. त्यातून त्यांच्यातील विश्वास वाढवता येतो. असे असले तरी मुलींना रोजचा संघर्षाचा सामना करावा लागतो. त्यातून त्यांच्यात असुरक्षेची भावना निर्माण होते. अगदी सातवीतल्या मुलीदेखील असुरक्षितपणाची शिकार बनल्या असून त्यांना मानसिक पाठबळ देण्याची गरज संवाद कट्ट्यावरून अधोरेखित करण्यात आली. प्रत्येकवेळी चुकांबद्दल मुलींना दोषी धरले जाते.

ही बाब चुकीची असून मुलांनादेखील चांगल्या वाईटाची शिकवण घरातूनच दिली तर त्यांच्याकडून छेडछाड किंवा त्यासम गुन्हे घडणार नाहीत. ज्यापद्धतीने मुलींवर घरात वा घराबाहेर बंधने टाकली जातात, त्याप्रमाणे मुलांवर देखील मर्यादा घातल्या तर समाजात देखील मुलींच्या सुरक्षिततेची भावना निर्माण होईल असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

सुरक्षाविषयक अ‍ॅप वापरा

महिलांसाठीच सुरक्षेविषयक अनेक अ‍ॅप गुगलवर उपलब्ध आहेत व त्यांचे लिंकिंग सरकारी सुरक्षा यंत्रणांशी देखील करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती या अप्लिकेशनचा देखील प्रभावी वापर करता येतो. हे करता असताना सोशल मीडियावरून कधीही अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात राहणे घातक ठरू शकते हे देखील दुर्लक्षित व्हायला नको.

कायद्याचे पाठबळ

समाजात माली किंवा महिलांवरील अन्याय अत्याचार याकडे आता गांभीर्याने पाहिले जात आहे. मुलीच्या संरक्षणासाठीचे कायदे अत्यंत कठोर असून फक्त त्याची प्रभावी अंलबजावणी करण्याची गरज असल्याकडे चर्चेत लक्ष वेधण्यात आले.पोलिसांकडून निर्भया पथकांच्या माध्यमातून महिला सुरक्षेविषयी सावधगिरी बाळगली जाते. एकट्या नाशिक शहरात अशी आठ पथके कार्यरत असून सध्या गणवेशात महिला अधिकारी व कर्मचारी त्यात कार्यरत आहेत. 24 तास या पथकांची निगराणी असते. शाळा, महाविद्यालये, बाजार या ठिकाणी अनेकदा कारवाया झाल्या आहे. निर्भया पथके स्वतःहून कारवाई करतात. तर तक्रारी आल्यास अशा तक्रारदाराचे नाव देखील गुप्त ठेवले जाते अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!