Type to search

Featured नाशिक

डेंग्यू निर्मूलन मोहीम सुरू; कॅन्टोन्मेंट परिसरात प्रतिबंधात्मक कारवाई

Share

‘देशदूत वृत्ताची दखल’

दे. कॅम्प । वार्ताहर

शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्या नंतर दै. देशदूतमध्ये वृत्त झळकताच प्रशासनाने युद्ध पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

काल सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधिकारी राजेंद्र ठाकूर, युवराज मगर यांनी हाडोळा, डॉ. आंबेडकर सोसायटी, धोंडी रोड, सहाचाळ, संजय गांधी नगर, स्टेशनवाडीसह इतर ठिकाणी फॉगींग मशीनने धूर फवारणी केली. तसेच आरोग्य विभागाकडुन जुने टायर जप्त करण्यात आले.

याशिवाय काही भागात घराघरात जाऊन फ्रीज जवळ डास निर्मुलन गोळ्या वाटप केल्या. या गोळ्या ठेवण्याबाबतची प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगितली. आरोग्य विभागाने सकाळपासून स्वच्छता मोहिम हाती घेतल्याने नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला.

हे आहेत उपाय
पाणी साठवण्याचे भांडे नियमित स्वच्छ करणे, फ्रीज, झाडाच्या कुंड्या, फुलदाणी यातील पाणी आठवड्यातून दोनवेळा बदलावे, छतावरील भंगार हटवणे, पिंपाची झाकणे घट्ट लावावे, कोठेही पाणी साचू देऊ नये, मच्छरदाणीचा वापर करावा.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!