करोनाच्या लढाईत देशवासीयांची एकजुट कौतुकास्पद; ‘मन की बात’ मधून मोदींनी केले कौतुक

करोनाच्या लढाईत देशवासीयांची एकजुट कौतुकास्पद; ‘मन की बात’ मधून मोदींनी केले कौतुक

नवी दिल्ली : करोना सारख्या भयाण संकटाशी लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. जगभरात या करोनाने अक्षरश: मृत्यूचे तांडव सुरु केले असून याविरुद्ध लढण्यासाठी सर्व देश एकवटले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन बात’ या कार्यक्रमातून देशाला संबोधित करत देशवासियांच्या एकजुटीचे कौतुक केले.

दरम्यान देशभरात करोनाने थैमान घातले असून या भीषण संकटाशी दोन हात करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असून सर्व शासकीय, वैद्यकिय यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. करोनाला देशातून हद्दपार करणे हा एकच आपल्या सर्वांचा उद्देश आहे असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

तसेच भारत सरकारने सुरु केलेल्या covidwarriors.gov.in या संकेतस्थळावरही लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी सुद्धा करोनाविरुद्ध लढा देत असून आपण जिंकणारच असा विश्वास नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे. लॉकडाऊनच्या काळात जनतेची मिळालेली साथ ही कौतुकास्पद असल्याचे सांगितले आहे.

तसेच भारताने इतर देशांना औषधांचा पुरवठा केला असून चांगले संबंध प्रस्थापित केले आहे. तसेच देशाचे भविष्य समजल्या जाणा-या तरुण पिढीने पुढे या आजाराविरुद्ध लढण्यासाठी आपले आधुनिक विचार आमच्यापर्यंत पोहोचवावे असेही ते म्हणाले. लोकांनी योग्य ती काळजी घ्या, मास्कचा वापर करा असा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com