Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

शेतकरी सन्मान योजनेत आतापर्यंत ५० लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे कर्ज माफ- सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची माहिती

Share

मुंबई | वृत्तसंस्था

शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी शासन राबवित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये आतापर्यंत ५०.२७ लाख कर्जदार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यात आले आहे. त्यासाठी २४ हजार १०२ कोटी रूपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा करण्यात आली आहे. या योजनेची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन राबविली जात आहे. अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

देशातील सर्वात मोठी ही कर्जमाफी असून यापूर्वी पंजाब राज्याने १० हजार कोटी रुपयांची, आंध्र प्रदेश- १५ हजार कोटी रुपयांची, कर्नाटक- ८ हजार कोटी, तेलंगणाना १० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती.

या योजनेत प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंतची कर्जमाफी देण्यात येते. एकाच कुटुंबातील व्यक्तीचे प्रत्येकी दीड लाखापर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्यात आले. नवीन कर्ज घेण्यासाठी कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले. त्यामुळे नवीन पीक कर्ज घेण्यासाठी कर्जदार शेतकरी पात्र झाला.

यात नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा २५ टक्के प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. अद्याप कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!