Wednesday, April 24, 2024
Homeनगरअकोले – प्रवरा नदी पात्रात बुडून ऊसतोड तरूणाचा मृत्यू

अकोले – प्रवरा नदी पात्रात बुडून ऊसतोड तरूणाचा मृत्यू

कळस (वार्ताहर) – अगस्ती सहकारी साखर कारखाना, अकोले येथील उसतोड तरूण कामगार कृष्णा वाळु मेंगाळ (वय २१, रा पेडकवाडी, ता कन्नड़, जि औरंगाबाद) याचा बुडून प्रवरा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे.

२५ मार्च रोजी दुपारच्या सुमारास कळस परिसरात बैल धुण्यासाठी प्रवरा नदी गेलेला असताना पाय घसरून पडला. नदीला सध्या मासिक रोटेशन चालु असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने सदर तरूणाचा बुडुन मृत्यू झाल्याचे समोर आले. पुढील तपास पोलिस करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या