लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्यांसाठी दिलासा ! ; गॅस सिलिंडर झाला स्वस्त

jalgaon-digital
2 Min Read

नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सोशल डिस्ंटसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. लोकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लॉकडाऊन दरम्यान सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. कारण विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.  सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे.

विना अनुदानित LPG गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहे. 14.2 किलो विना अनुदानित गॅस सिलिंडर 162.5 रुपयांनी स्वस्त झाला आहेत. दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर आणि 19 किलो सिलिंडर स्वस्त झाला आहे. 19 किलो वजनाचा सिलिंडर 256 रुपयांनी स्वस्त झाला. दिल्लीमध्ये सिलिंडरची किंमत 581.50 रुपये आहे. मुंबईत एलपीजी सिलेंडरची किंमत 579 रुपये झाली आहे. IOC ने  दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सिलिंडरचे दर 744 वरून 581 वर आले आहेत. कोलकातामध्ये हे दर 774.50 वरून 584.50, मुंबईत 714.50 वरून 579.00 तर चेन्नईत 761.50 वरून 569.50 रुपये झाले आहेत.

दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडर 1 एप्रिल रोजी 61 आणि 62 रुपयांनी स्वस्त झाला होता. तर कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 65 रुपयांनी तर चेन्नईमध्ये 64.50 रुपयांनी कमी झाली होती. सध्या दिल्लीत विना अनुदानित 14.2 किलो एलपीजी सिलिंडरची किंमत 774 रुपये आहे. तर कोलकातामध्ये 774 रुपये, मुंबईत 714.50 आणि चेन्नईमध्ये 761.50 रुपये आहे. 1 एप्रिलपासून नवे दर लागू करण्यात आले होते. याआधी एक मार्चला गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या होत्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *