Saturday, April 27, 2024
Homeनगरनरबळी नव्हे ‘आपत्ती’ भंग ?

नरबळी नव्हे ‘आपत्ती’ भंग ?

‘त्या’ प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल, 2 गाड्या जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- नरबळीच्या चर्चेने तापलेले वातावरण आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या भंगापालिकडे काही नसल्याचा तपास पूर्ण करत पोलिसांनी शांत केले आहे. या प्रकरणात आपत्ती कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत सापडलेल्या सर्वांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

- Advertisement -

नगर एमआयडीसीतील एक उद्योजक शेंडीबायपास येथे राहतात. त्यांच्या ओळखीचे महाराज जवळच्याच गावात वस्तीवर चार-पाच दिवसांपासून मुक्कामी होते. याच काळात त्यांच्याकडे एक महिला आली. तिच्यासोबत एक पुरुषही होता. सोबत पुण्याचा एक तरुणही होता. हाताला काम देण्याचा शब्द देत या सर्वांना वस्तीवर मुक्कामी ठेवण्यात आले होते, असे समजते.

दरम्यानच्या काळात घराशेजारीच मोठा खड्डा खोदल्याचे काही गावकर्‍यांनी पाहिले. नरबळीचा तर प्रकार नव्हे म्हणून संशय बळावला. तशी माहिती गावकर्‍यांनी ग्रामसुरक्षा करोना समितीला दिली. समितीने ही माहिती पोलिसांना कळविली. पोलिसांनी तातडीने धाव घेतली. पोलीस पोहचले तेव्हा गावकर्‍यांचा जमाव जमला होता. पोलिसांनी आपल्या चौकशीत हे वेगळे प्रकरण असल्याचे शोधून काढले. त्यामुळे भेदरलेल्या उद्योजकासह संशयाची सुई असलेल्या सर्वांचे जीव भांड्यात पडले. मात्र गावकरी या तपासावर समाधानी नसल्याचे चित्र आहे.

नगर पोलिसांनी महिला, तिचा मित्र, साथीदार महाराज आणि नगरचा एक उद्योजक यांच्या विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्यातंर्गत गुन्हा नोंदविला असून या सगळ्यांना क्वारंटाइन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी एक मोटारसायकल व एक कार जप्त केली आहे.

दरम्यान, घराशेजारी खड्डा का होता, हा प्रश्न गावकर्यांसमोर कायम आहे. तो शोषखड्डा आहे, हा तपासातील शोध गावकर्‍यांना पटलेला नाही. त्यामुळे गावात अद्यापही त्याची चर्चा आहे. रात्रभर उलटसुलट चर्चेमुळे तापलेल्या या प्रकरणात पोलिसांनी उद्योजक, महाराज, महिला व अन्य जणांना का आणि कशी मदत केली याची नवीच चर्चा गावात फुटली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या