Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीत तरुणीवर अत्याचार

Share
लग्नाचे आमिष दाखवून शिर्डीत तरुणीवर अत्याचार, Latest News Crime News Shirdi

आरोपीस मदत; उपनगराध्यक्षांसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिर्डी (प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून अकोले येथील नोकरी करीत असणार्‍या पदवीधर तरुणीस शिर्डी येथील हॉटेलवर तसेच अन्य वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्यास मदत करणारे शिर्डीचे उपनगराध्यक्ष व अन्य तिघांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले परिसरात राहणार्‍या पदवीधर व नोकरी करीत असलेल्या तरुणीला आकाश रमेश त्रिभुवन याने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शिर्डी येथील हॉटेलवर तसेच पुणे येथे वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आकाश यास 4 जणांनी सहकार्य केले. लग्नास नकार देऊन फसवणूक केली. सध्या पीडित तरुणी एका रुग्णालयात उपचार घेत आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन शिर्डी पोलिसांनी आकाश रमेश त्रिभुवन, रमेश वामन त्रिभुवन, मंगेश वामन त्रिभुवन, राजेंद्र वामन त्रिभुवन, संजय वामन त्रिभुवन सर्व रा. लक्ष्मीनगर, शिर्डी यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम 376, 2, एन 420, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, श्री. दातरे, दिपक गंधाले यांनी पीडित तरुणीची भेट घेऊन माहिती घेतली. याप्रकरणी सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे पुढील तपास करीत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!