Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ढवळपुरीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Share
नेवाशाच्या मशिदीत आढळले 10 परदेशी नागरिक, Latest News Newasa Mosque Foreign People

एकतर्फी प्रेमातून अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

भाळवणी (प्रतिनिधी) – पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या गेटजवळ एकतर्फी प्रेमातून एका अल्पवयीन मुलीचा दुचाकी आडवी लावून तिचा विनयभंग केला तसेच माझ्यावर प्रेम कर अन्यथा अ‍ॅसिड टाकून उभी कापून टाकीन अशी धमकी दिल्याची घटना दि. 24 जानेवारी रोजी घडली.

यासंबंधी पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की एका अल्पवयीन मुलाने मुलीची इच्छा नसतानाही तिच्या इच्छेविरुद्ध त्याच्याकडील मोटारसायकलवरून पाठलाग करुन दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता मोटरसायकल आडवी लावून माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून तिच्या तोंडात मारले व तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.

जर माझी नाही झालीस तर तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकीन व तुला उभे कापून टाकीन. तू माझे वाटोळे केले तर मी तुझे वाटोळे करीन अशी धमकी दिली. याबाबत पीडित मुलीने पारनेर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी या घटनेची तातडीने दखल घेऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला बाल न्यायालयात हजर केल्यानंतर समज देऊन पालकांच्या स्वाधीन केले.

या घटनेने ढवळपुरी गावात खळबळ उडाली असून फिर्यादी मुलगी व आरोपी हे दोन्ही अल्पवयीन असल्याने दोघांनाही पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजयकुमार बोत्रे यांच्यासह सहायक फौजदार व्ही. एस. लोणारे हे करीत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!