Monday, April 29, 2024
Homeनगरतलवार घेऊन नाचणार्‍या युवकांविरुध्द गुन्हा दाखल

तलवार घेऊन नाचणार्‍या युवकांविरुध्द गुन्हा दाखल

पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाटा येथील घटना

पाथर्डी (तालुका प्रतिनिधी) – नववर्षाचे स्वागत व वाढदिवस साजरा करताना हातात तलवार घेऊन डीजे च्या तालावर नाचणार्‍या युवकांच्या टोळक्यावर बेकायदा हत्यार बाळगून जमावबंदी आदेशाचा भंग करण्याची घटना बुधवारी फुंदेटाकळी फाटा येथे घडली. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे रा. फुंदेटाकळी यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की बुधवार 1 जानेवारी 2020 रोजी सायंकाळच्या वेळी फुंदेटाकळी फाटा येथे किरण गोरक्ष फुंदे याचा वाढदिवसाचा कार्यक्रम होता. यावेळी युवकांनी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी डीजे लावला होता. डीजेसमोर नाचताना युवकांच्या हातामधे उघडी तलवार होती.

तलवार हातात धरुन नाच करण्यात युवक दंग झाले होते. फुंदेटाकळी फाटा येथून या घटनेची माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली. अहमदनगर येथील पोलिसांनी पाथर्डी पोलिसांना घटनेची माहिती सांगितली .त्यानंतर पाथर्डी पोलिसांनी खात्री केली तेव्हा वाढदिवसाचा कार्यक्रम जोरात सुरु होता. याबाबत किरण बडे (पोलीस कर्मचारी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. किरण गोरक्ष फुंदे, अमोल गोरक्ष फुंदे रा. फुंदेटाकळी यांच्यासह आठ ते दहा जणांविरुद्ध पोलिसांनी बेकायदा हत्यार बाळगून जमावबंदी आदेशाचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पाथर्डी तालुक्यात कायद्याची भीती व पोलिसांचा वचक राहिला नसल्याने चोर्‍या, घरफोडी, मारामारी,गुंडगिरी, वाहतुूकोंडी,असले प्रकार दररोज घडत आहेत. त्यामुळे तालुक्याला आता खमक्या पोलीस अधिकार्‍याची गरज असल्याची भावना जनतेमधून व्यक्त होत आहे. टाकळीफाटा येथील घटनेत सार्वजनिक शांतता भंग होत असल्याने पोलीस काय कारवाई करतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या