Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

पेट्रोल टाकून दुचाकी जाळली बोल्हेगावातील घटना

Share
सुपा येथे अपहरण करुन खंडणी मागितली; आरोपी फरार, Latest News Supa Kidnaping Ransom Demand supa

अहमदनगर (प्रतिनिधी) – पोलीस ठाण्यात दिलेली मारहाणीची तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून चौघांनी एकाची दुचाकी (क्र. एमएच- 16 बीएन- 4674) पेट्रोल टाकून जाळली. मंगळवारी (दि. 14) बोल्हेगावातील गांधीनगर येथे ही घटना घडली. या प्रकरणी सुशांत पोपट नांगरे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) व अन्य अनोळखी तिघांविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम राजेंद्र शेवंते (वय- 26 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सुशांत नांगरे यांनी विक्रम शेवंते यांना यापूर्वी मारहाण केली होती. त्याची पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरून शेवंते यांची दुचाकी नांगरे व अन्य तिघांनी पेट्रोल टाकून पेटून दिली. पुढील तपास सहायक फौजदार ए. पी. भोसले करत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!