नगर : पैशावरून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा

नगर : पैशावरून चौघांना जीवे मारण्याचा प्रयत्न; आठ जणांविरुद्ध गुन्हा
अहमदनगर (प्रतिनिधी) – हात उसणे घेतलेले दहा हजार रुपये मागण्यांसाठी गेलेल्या चौघांना आठ जणांनी तलवार, चाकू व गजाने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पाईपलाईन रोडवरील संकल्प हॉटेलमध्ये घडली. मारहाणीत अमोल संभाजी बोचरे, मारुती शंकर बोचरे, विलास शंकर शिंदे (रा. साकत ता. नगर), दीपक दरेकर (रा. सारसनगर, नगर) जखमी झाले आहे.
जखमी स्वतः वाहनाने तोफखाना पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. जखमी अमोल बोचरे यांनी दिलेल्या जबाबा वरून पोलिसांनी फिर्याद दाखल केली आहे. मारहाण करणारे नवनाथ दळवी, योगेश खैरनार, दीपक शिंदे, दीपक (हॉटेलचा वेटर) व चार अनोळखी अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आज सकाळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com