Wednesday, April 24, 2024
Homeनगरनांदुर्खीतील तरूणाच्या खून प्रकरणी हॉटेल मॅनेजरला अटक

नांदुर्खीतील तरूणाच्या खून प्रकरणी हॉटेल मॅनेजरला अटक

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – शिर्डी लगत असलेल्या नांदुर्खी पाट येथे सुनील अशोक मुर्तडक याची दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या युवकाच्या हत्येमुळे शिर्डी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते, दरम्यान, खुनातील आरोपींचा शिर्डी पोलिसांनी कसून शोध लावत अठ्ठेचाळीस तासांंच्या आतच गजाआड करून आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दरम्यान दि. 4 रोजी नांदुर्खी येथील पाटाच्या कडेला सकाळी एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलीस पाटील सोमनाथ वाणी यांनी दिली होती. त्यानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन मृत देहाची पाहणी केली. सदरचा मृतदेह हा राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथील सुनील अशोक मुर्तडक (वय 25)याचा असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली.

- Advertisement -

मृतदेहाच्या डोक्यात झालेल्या जखमा पाहता त्यास रात्रीच्या वेळी कोणीतरी डोक्यात हत्याराने वार करून गंभीर जखमी करून त्याचा खून केला असावा असा संशय आल्याने शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्यासह शिर्डी पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा. पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, प्रवीण दातरे, पोसई संजय सोनवणे, पोसई बारकू जाणे तसेच कर्मचारी त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर येथील पोलीस उपनिरीक्षक गणेश इंगळे व कर्मचारी आदींनी वेगवेगळी पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेने सखोल तपास सुरू केला.

संशयितांना यावेळी तातडीने ताब्यात घेण्यात आले त्यापैकी सोमनाथ चांगदेव गुंजाळ (वय 25 वर्षे राहणार रामपूरवाडी, ता. राहाता) याच्याबद्दल जास्तच संशय बळावल्याने त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत गुन्ह्याशी काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने कबुली दिली.

याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनला भादंवि कलम 302, 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कामगिरी जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सहा पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, सहा पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे, संजय सोनवणे, पो.स.ई. बारकू जाणे, वैभव रुपवते यांच्यासह शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो.ना वाळके, पो.ना अंधारे, पो.ना मकासरे, पो.ना. सोनवणे पो.ना दिनकर, पो.ना. किरण कुर्‍हे, पो.काँँ फिरोज पटेल, पगारे, वेताळ, कैलास राठोड त्याचप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पो.स.ई गणेश इंगळे व इतर कर्मचारी यांनी जीवे ठार मारणे यासारख्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना उघडकीस आणला असून सदर गुन्ह्यातील आरोपीस अटक करून राहाता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक दीपक गंधाले करीत आहेत.

दारूच्या कारणातून…
उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. आरोपी सोमनाथ गुंजाळ हा कोर्‍हाळे येथील हॉटेल पालवी येथे मॅनेजर असून दि.3 मार्च रोजी रात्रीच्या वेळी दारू देण्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीतून सोमनाथ यास राग येऊन त्याने मयत यास नांदुर्खीपाट जवळ आणून त्याच्या डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी करून त्याचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह कालव्याच्या पाण्यात टाकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या