Type to search

क्रीडा

उद्यापासून भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात वनडे मालिका

Share
उद्यापासून भारत दक्षिण आफ्रिका यांच्यात काटे कि टक्कर Latest News Cricket IND vs SA 1st ODI Dharamsala Tomorrow

धरमशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हिमाचल प्रदेश मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

न्यूझीलंड विरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता मायदेशात आफ्रिकेवर मात करून विराटसेना विजयी ट्रॅकवर परतण्यासाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे क्विंटन डिकॉकच्या नेतृत्वात आफ्रिकेने ऑस्ट्रेलिया संघावर ३-० अशी मात केली होती. आता भारताला नमवण्यासाठी आफ्रिका काय रणनीती आखते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हा सामना दुपारी १:३० वाजता खेळवण्यात येणार आहे.

भारतीय संघात रोहित शर्माच्या अनुपस्थितीत युवा पृथ्वी शॉ तसेच शिखर धवन, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि शुभमन गील यांना संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, शुभमन गील, श्रेयस अय्यर, मनीष पांडे यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये हार्दिक पंड्या जडेजा आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, नवदीप सेनी, जसप्रीत बुमरा, कुलदीप यादव युझवेन्द्र चहल आहेत.

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची मदार डिकॉक, बाऊमा, फाफ डू प्लेसिस, जॉर्ज लिंडे, जानेमान म्लान, डेविड मिलर, रुसी व्हेंडर, डू सेन कायले वेरेन यांच्यावर आहे. अष्टपैलूंमध्ये जे स्मट्स, आंद्रे पीटलूकवयो आहेत. गोलंदाजीत बेऊर्न हेन्ड्रिक्स, केशव महाराज, लुंगी इंगिडी, अँड्रीच नॉर्टीजे, लोटो सिम्पला आहेत.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!