Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

आजी-माजी 29 नगरसेवकांना गुन्हे शाखेचे समजपत्र

Share
आजी-माजी 29 नगरसेवकांना गुन्हे शाखेचे समजपत्र, latest News Corporators Letter Shrirampur

श्रीरामपूर नगरपालिका भुयारी गटार अपहार प्रकरण

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर नगरपालिका भुयारी गटार अपहार प्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधिक्षक प्रांजली सोनवणे यांनी 29 माजी नगरसेवकांना समजपत्र बजावले आहे. त्यात काही विद्यमान व सत्ताधारी नगरसेवकांचाही समावेश आहे.

श्रीरामपूर नगरपालिकेत केंद्र व राज्य सरकार यांच्या निधीतून भुयारी गटार योजना राबविण्यात आली. परंतु त्यामध्ये अपहार झाल्याची तक्रार मोरया फाउंडेशनचे केतन खोरे यांनी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळचे जिल्हा पोलीस प्रमुख इशु सिंधू यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेतली होती. आता या प्रकरणाचा तपास जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक प्रांजली सोनवणे या करत आहेत.

या प्रकरणाच्या तपासाबाबत चौकशी करण्यासाठी दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी तपासी अधिकारी डीवायएसपी प्रांजली सोनवणे यांनी पालिकेतील सुमारे 29 आजी-माजी नगरसेवक व नगरसेविकांना समजपत्र पाठविले आहे. त्यांना दि. 20, 22 व 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता नगर येथील पोलिस अधिक्षक कार्यालयातील गुन्हे शाखेत चौकशीसाठी बोलवले आहे.

हे समजपत्र बाजावलेल्या आजी-माजी नगरसेवकांमध्ये विद्यमान नगरसेवक भारती अनिल कांबळे, शेख अंजुम परवेज मुसा अहंमद, मुजफ्फर पापाभाई शेख, श्रीनिवास लक्ष्मीनारायण बिहाणी, राजेश अलघ, सुभाष विठ्ठल गांगड तर माजी नगसेवकांमध्ये सौ. सुधा संतोष कांबळे, आशिष विजय धनवटे, सौ. शेख निलोफर महंमद, रवींद्र गिरधारीलाल गुलाटी, राजश्री राजेंद्र सोनवणे, सुमैया मुनीर उर्फ मुन्ना पठाण, श्याम अर्जुन अढांगळे, जायदाबी कलीम कुरेशी, अण्णासाहेब रेवजी डावखर, राजन चुग, मंगल सुभाष तोरणे, कांचन दिलीप सानप, संगीता अरुण मंडलिक, व्यंकटरमन कैलास नारायण, शेख सायरा सलीम, राघेश्वरी सुनील मोरे, राजेंद्र नानासाहेब म्हांकाळे, मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे, निर्मला भाऊसाहेब मुळे, दत्तात्रय साबळे, कल्याण बुधमल कुंकूलोळ यांचा समावेश आहे. या 29 जणांच्या यादीत समाविष्ट असलेल्या नगरसेविका रजियाबी शब्बीर जहागीरदार यांचे डिसेंबर 2018 मध्ये निधन झाले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!