Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोना : पलायननाट्याने नगरला गोंधळ

कोरोना : पलायननाट्याने नगरला गोंधळ

जिल्हा रुग्णालयातून निघून गेलेले कोरोनाचे तीन संशयित पुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल संशयित कोरोना रुग्णांपैकी तीन जण पसार झाल्याने एकच गोंधळ उडाला. याबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलीस ठाण्यात लेखी पत्र दिल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले. पोलिसांनी शोधासाठी तीन पोलीस पथके तातडीने रवाना केली. पसार झालेले तीनही रुग्ण स्वत: रात्री उशिरा पुन्हा रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर या गोंधळावर पडदा पडला.

- Advertisement -

जिल्हा सरकारी रुग्णालय आणि बूथ हॉस्पिटल या ठिकाणी एक कोरोना पीडित आणि उर्वरित 19 संशयितांना ठेवण्यात आलेले आहेत. या सर्वांनावर शासकीय वैद्यकीय अधिकार्‍यांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. या ठिकाणी या रुग्णांसाठी खास आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आलेले आहेत.

यातील जिल्हा रुग्णालयाच्या वॉर्डातून शनिवारी (दि.14) आंतररुग्ण विभागात दाखल 3 संशयीत रूग्ण पसार झाले. हे संशयीत समाजाच्यादृष्टीने घातक सिध्द होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीसांनी तातडीने या रुग्णांना पकडून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे पत्र जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सकांनी पोलीसांना दिल्याने गोंधळात भर पडली. यानंतर पोलिसांनी तातडीने शोधासाठी पथके रवाना केली. रात्री उशिरा पसार झालेले तीघे संशयीत रूग्ण पुन्हा स्वत: रूग्णालयात परतल्याची माहिती प्रशासनाने दिल्यानंतर यंत्रणांनी सुटकेचा श्वास सोडला. होते

या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी गेलेले संशयीत रूग्ण पुन्हा येणार आहेत. पोलीसांना दिलेल्या पत्राविषयी विचारणा केली असता, प्रोटोकॉलनूसार पत्र देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या