Thursday, April 25, 2024
Homeनगरकरोनाचे 31 अहवाल निगेटिव्ह ; जामखेडमधील 13 रिपोर्टचा समावेश 

करोनाचे 31 अहवाल निगेटिव्ह ; जामखेडमधील 13 रिपोर्टचा समावेश 

अहमदनगर (प्रतिनिधी)-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे रविवारी सकाळी 31 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 14 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून ते सर्व रविवारी रात्रची उशीरा प्राप्त झाले होते. उर्वरित 17 व्यक्तींचे अहवाल सोमवारी रात्री आले असून ते सर्व निगेटिव्ह आहेत. यामुळे दोन दिवसांत निगेटिव्ह अहलवाची संख्या 31 झाली असून यात जामखेडमधील 13 अहवालाचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात जामखेड शहरातील मृत करोना बाधीत व्यक्तींच्या कुटूंबियाच्या संपर्कात आलेल्यांचा पॉझिटिव्ह येत असल्याने जिल्ह्यातील करोना बाधीतांचा आकडा 43 वर पोहचला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग आखणी अर्लट झाले आहे. राज्यासह जिल्ह्यातील लॉकडाऊन संपण्याचा कालावधी जवळ येत असतांना बाधीतांची संख्या वाढल्याने नगरकरांची काळजी वाढली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील करोना बाधीत 43 व्यक्तींपैकी 24 व्यक्तींनी करोनाव मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 513 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील 1 हजार 431 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव्ह आले असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
- Advertisment -

ताज्या बातम्या