Thursday, April 25, 2024
Homeनगरकोरोनाचे आणखी चार अहवाल निगेटिव्ह

कोरोनाचे आणखी चार अहवाल निगेटिव्ह

9 अहवाल नाकाराले : सारी रुग्णांची नोंद जिल्हा आरोग्य विभागाला करणे बंधनकारक

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे गुरूवारी रात्रीपर्यंत पाठविलेल्या 33 व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवालापैकी 13 अहवाल शुक्रवारी रात्री प्राप्त झाले. यात 4 अहवाल निगेटिव्ह आणि उर्वरित 9 अहवाल नाकारण्यात आले असून ते पुन्हा पाठविण्यात येणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात सारी रुग्णाची संख्या 42 असून यापुढे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येणार्‍या आणि उपचारार्थ दाखल करण्यात येणार्‍या सारी रुग्णांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देणे सरकारने बंधनकारक केली आहे.

गुरूवारी पाठविण्यात आलेल्या 33 पैकी 13 नमुन्यांचा अहवाल आला असून उर्वरित 20 आणि शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या 24 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने असे 44 अहवालाची आता प्रतिक्षा आहे. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत 1 हजार 235 व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील  1 हजार 166 व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये 14 दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे. शुक्रवारी पाठविण्यात आलेल्या अहवालात 14 दिवस पूर्ण केलेल्या 9 कोरोना बाधीत व्यक्तींच्या स्त्राव चाचणीचा समावेश आहे.

जिल्ह्यात सारीचे रुग्णही आढळत असून 11 एप्रिलपासून ते कालपर्यंत 42 रूग्ण सापडले आहेत. यात 23 पुरुष, 15 महिला आणि 4 मुलांचा समावेश आहे. शुक्रवारी त्यात वाढ झालेली नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या