Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील कुणालाही कोरोना संसर्ग नाही

Share
हॉटस्पॉटमुळे संगमनेर, मुकुंदनगर आलमगीर, जामखेडमध्ये सामसूम, Latest News Hotspot Sangmner Mukundnagar jamkhed

लोणी (वार्ताहर)- लोणी येथील प्रवरा रुग्णालयाच्या 36 जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप ठाकूर यांनी दिली. प्रवरा ग्रामीण रुग्णालय लोणी येथे 4 एप्रिल रोजी आलेल्या कोरोना संशयित रुग्ण तातडीच्या रुग्ण सेवा विभागात उपचाराकरिता आला असता प्रवरा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या रुग्णाला तपासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नगर येथे रुग्णवाहिकेतून दाखल केले होते.

तो रुग्ण 5 एप्रिल रोजी बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथे दाखल केले असता त्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनास माहिती देण्यात आली व त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टर, नर्सिंग, तसेच इतर कर्मचार्‍यांची तपासणी करणेबाबत कळविण्यात आले.
जिल्हा प्रशासनामार्फत सूचना मिळाल्यानंतर ताबडतोब प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीस प्रवरा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले व त्वरित त्यांचे घशातून स्त्राव घेऊन सिव्हिल हॉस्पिटल यांच्यामार्फत तपासणीकरीता पाठविण्यात आले.

प्रवरा आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये एकूण 39 लोकांना दाखल करण्यात आले. यात 16 डॉक्टर, 14 नर्सिंग, 2 एक्स-रे टेक्निशियन, 5 अटेंडट, 1 ड्रायव्हर, 1 वॉचमन, 1 लिफ्ट ऑपरेटर यांचा समावेश आहे. यातील 36 रुग्णाचे कोरोना अहवाल दि 8 एप्रिल रोजी प्राप्त झाले असून त्या कुणालाही कोरोना संसर्ग झालेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 4 जणांचे अहवाल अद्याप येणे बाकी आहे, अशी माहिती प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप ठाकूर यांनी दिली.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!