Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या 132 जणांवर चॅप्टर

Share
नगर: रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍या 132 जणांवर चॅप्टर, Latest News Corona Problmes Police Action Start Ahmednagar

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेदरम्यान टगेगिरी करणार्‍या 132 जणांवर पोलिसांनी चॅप्टर केस दाखल केली. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सगळं काही बंद केलं आहे. विनाकारण रस्त्यावर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. शहरात पोलीस गस्त घालत असताना रस्त्यावर गैरवर्तन करणार्‍या टग्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर 112 व 117 प्रमाणे कारवाई केली.

कलेक्टर राहुल द्विवेदी यांच्या आदेशाने, एसपी सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने ही कारवाई केली. भिंगार, तोफखाना आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत.

तोफखाना, कोतवाली अन् भिंगार
बंद दरम्यान घरातच बसा. विनाकारण घराबाहेर येवू नका. उगाच गर्दी करू नका. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात 65, तोफखाना 55 आणि भिंगार पोलिसांत 12 असे 132 जणांविरोधात पोलिसांनी गैरवर्तन केली म्हणून ताब्यात घेत चॅप्टर केली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!