Tuesday, April 23, 2024
Homeनगरकोरोनाच्या धास्तीने स्वस्तिक बसस्थानक पडले ओस !

कोरोनाच्या धास्तीने स्वस्तिक बसस्थानक पडले ओस !

अहमदनगर (प्रतिनिधी)- संपूर्ण जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचे सावट आता नगरमध्ये पोहचले आहे. या कोरोनाच्या संसर्गाचा व्यवसाय व वाहतुकीवर परिणाम होतांना दिसत आहे. शहरातील स्वस्तिक बसस्थानकात प्रवाशांअभावी पूर्णपणे शुकशुकाट असल्याचे चित्र शनिवारी पाहायला मिळाले.

अहमदनगर शहरातून पुणे, मुंबई, औरंगाबाद येथे जाण्यासाठी स्वस्तिक बसस्थानक महत्वाचे मानले जाते. या बसस्थानकातून रोज हजारांच्या संख्येने बसगाड्यांची ये-जा करत असतात. तसेच शनिवारी व सोमवारी पुण्याला जाणार्‍या प्रवाशांची संख्या इतर दिवसांच्या तुलनेत लाक्षणीय असते.

- Advertisement -

त्यातच महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे कोरोनोचे रुग्ण आढळले असतानाच नगर मध्येही कोरोनो पॉझिटिव्ह आढळून आल्याने नागरिकांनी याचा चांगलाच धसका घेतल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. याचा परिणाम सरकारी प्रवासी बससह खासगी प्रवासी वाहतुकीच्या साधनांना बसत आहे. तसेच शहरातील व्यवसायावर बसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या