Wednesday, April 24, 2024
Homeनगरकोरोनामुळे साखर कडू !

कोरोनामुळे साखर कडू !

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर कोलमडले; निर्यात होणार ठप्प

कोल्हापूर/अहमदनगर – कोरोनामुळे निर्यातीसाठी जहाजे उपलब्ध न झाल्यास तूर्तास साखर निर्यातच ठप्प होण्याची शक्यता साखर कारखानदारांकडून वर्तविण्यात येत आहे. असे अघटित घडल्यास साखर उद्योगावर परिणाम होणार असून एकप्रकारे साखर ही उत्पादकांसाठी कडू ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील साखरेचे दर प्रती पौंड 15 सेंटवरून 12 ते 12.5 सेंटपर्यंत खाली आले आहेत.

- Advertisement -

जगभरातील साखरेचे उत्पादन यंदा तुलनेने घटल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर प्रति किलो 15 सेंटपर्यंत वधारले होते. गेल्या दोन वर्षातील हा उच्चांक होता. भारतात अतिरिक्त साखर शिल्लक असल्याने निर्यातीला मोठी संधी आहे. केंद्र सरकारनेही 60 लाख टन निर्यातीचे लक्ष्य देताना निर्यात सवलतीही देऊ केल्या आहेत.

याबाबत बोलताना साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे म्हणाले, ही साथ कमी झाल्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजार सुधारणार नाही. निर्यातीसाठी जहाजेही मिळणार नाहीत. यंदा 60 लाख टन साखर निर्यातीचे लक्ष्य गाठणे कठीण आहे. आतापर्यंत सुमारे 38 लाख टन साखर निर्यातीचे करार झालेले आहेत. तर सुमारे 23 लाख टन साखरेची प्रत्यक्ष निर्यात झाली आहे. चांगला दर मिळत असल्याने साखर कारखानदारातही उत्साहात होते. या हंगामात लक्ष्याच्या जवळपास म्हणजेच 50 ते 55 लाख टन साखरेची निर्यात होईल असा अंदाज होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या