Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनाने ‘तिच्या’ आले धैर्य

Share
Jalgaon

– संदीप रोडे

भल्या पहाटे मारली मोटारसायकलला किक

अहमदनगर – मेस बंद, कॉलेज बंद, देश लॉकडाऊन, भाडोत्री खोलीत 21 दिवस काढणार कसे? आईबाबांकडे जायचे पण सोयच नाही. या विवंचनेत सापडलेली ऐश्वर्या धाडसाने भल्या पहाटे मोटारसायकलवर नगरला निघाली. वाटेत मोटारसायकल बिघडली. मोठ्या धाडसाने पहाटेच्या सुमारास ती तासभर वाटेतच उभी राहिली. मामाच्या रुपाने देव धावत आला नि ती सुखरूप घरी पोहचली.

ऐश्वर्या वैभव सोलंकी असे या रणरागिनीचे नाव. मुळची नगरची असलेली ऐश्वर्या औरंगाबादला शासकीय महाविद्यालयात बीडीएसचे शिक्षण घेते. कोरोनाचे संकट गडद होत गेले नि एकमेकांचा संपर्कच तुटला गेला. कॉलेज अगोदरच बंद झाले होते. त्यानंतर मेसही बंद झाली. भाडोत्री खोलीत किती दिवस राहणार? अजून 21 दिवस लॉकडाऊन संपयाची वाट पाहत बसणार तर नगरला आई-बाबांकडे पोहचणार कशी? आई-बाबाही चिंतेत. त्यांनी नगरला बोलविले, पण येणार कसे? मग बाबांनी दिलेली मोटारसायकल कामाला आली.

पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास ती नगरला यायला निघाली. भीतभित रस्ता कापू लागली. नगरच्या हद्दीपर्यंत आली नि तिची गाडी बंद पडली. पहाटेचे पाच वाजलेले. रस्ता सुनसान, जीव घाबरला. अशाही परिस्थितीत तिने धीराने मामा डॉ. अभय भाटिया यांना फोन केला. तिची आपबिती ऐकून मामा तडक मोटारसायकलने तिच्याकडे निघाले. मामा येईपर्यत ती तासाभर रस्त्याच्या कडेला उभी होती. मामा पोहचल्यानंतर त्यांनी तिची मोटारसायकल एका वस्तीवर पार्क केली अन् तिला वांबोरीत आणले. मामाच्या घरी सुखरूप पोहचणार्‍या ऐश्वर्याला मदत झाली ती नगरचे नगरसेवक गणेश भोसले यांची

ते आडवाटेने तान्हुल्यासह घरी पोचले
पुण्यात नोकरीला असलेले नगरचे सोनवणे दाम्पत्य चिमुकल्या बाळासह मोटारसायलवरून नगरला आले. नगरच्या विनायकनगर भागात ते राहतात. प्रवासाची साधने बंद, नोकरीही नाही, पुण्यात राहणार कसं असा विचार करून ते नगरला आले. केडगावच्या चेक पॉइंटवर पोलिसांनी त्यांना अडविले. ओळख सांगितली पण पोलिसांनी त्यांना नगरात येण्यास मनाई केली. बाळाला पाहूनही पोलिसांना दया आली नाही. पोलिसांनी त्यांना माघारी धाडसे. नगरची माहिती असल्याने आडवाटेने ते विनायकनगरच्या घरी पोहचले.

शहरातील अन् वार्डातील अनेक मुल शिकायला मुंबई, पुण्याला आहेत. कोरोनाच्या संकटात ते अडकून पडलेत. मदत मागताहेत. पोलीस मात्र नगरसेवकांनाही घराबाहेर पडू देत नाही. अशावेळी मदत कशी करणार? प्रशासनाने त्यांचे ओळखपत्र देऊन मदतीची सोय केली तरी चालेल. लोक नगरसेवक नात्याने मदत मागतात, पण बंदीमुळे इच्छा असूनही मदत करता येत नाही. प्रशासनाने त्यातून मार्ग काढावा.
– गणेश भोसले, नगरसेवक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!