Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनाचा धसका : राळेगणमध्ये पर्यटकांना ‘नो एण्ट्री’

Share
कोरोनाचा धसका : राळेगणसिध्दीत पर्यटकांना नो एन्ट्री, Latest News Corona Problems Ralgan Sidhi No Entry Ahmednagar

सुपा (वार्ताहार)- कोरोना व्हायरसची साथ आटोक्यात येईपर्यंत आपल्याला भेटायला राळेगणसिद्धीमध्ये कोणीही येऊ नये, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पत्रकाद्वारे केले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, या व्हायरसच्या साथीला धैर्याने तोंड द्यावे. साथ आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक त्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही हजारे यांनी केले आहे.

आदर्श गाव राळेगणसिद्धीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कोरोना संसर्गजन्य आजार असल्याने तो एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने या आजाराचा धोका वाढला आहे.

त्यामुळे गाव परिसर, राज्य आणि देशाच्या लोकांचा आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने खबरदारी म्हणून पर्यटकांनी राळेगणला येण्याचे टाळावे असे प्रेमळ आवाहन अण्णांनी केले आहे. शासनाकडून जोपर्यंत हा आजार आटोक्यात आणला आहे असे निर्देश येत नाहीत, तोपर्यंत पर्यटकांनी राळेगणला येण्याचे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!